ठाणे: इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

March 16, 2014 1:18 PM0 commentsViews: 704
Thane -bulding fire16 मार्च :  ठाण्यातल्या समता नगर भागात एका रहिवासी इमारतीला आज पहाटे आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
पहाटे लागलेल्या भीषण आगीवर 12 अग्निशामन दलाच्या गाड्यांनी नियंत्रण मिळविले आहे. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शिवाजी चौगुले (वय 84) व निर्मला चौगुले (वय 78) वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाला. मात्र आगीत अडकलेल्या विक्रमादित्य सावे, राजीव सावे आणि रंजना सावे या तिघांना वाचवण्यात फायर ब्रिगेडला यश आलं.
आग लागल्यानंतर सावे दाम्पत्यानं स्वतःला वाचवण्यासाठी धडपड केली आणि त्यात त्यांना यशही आलं. त्याचवेळी कोट्यवधीची उपकरणं असूनही आगीपर्यंत पोहोचण्यास फायर ब्रिगेडला उशीर झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात होता.
close