वाराणसीतून मोंदीविरोधात केजरीवाल लढणार?

March 16, 2014 1:45 PM1 commentViews: 1584
modi kejruy16 मार्च :  देशभरात अल्पावधीतच प्रसिद्धी मिळविलेले आम आदमी पक्षाचे नेते अऱविंद केजरीवाल हे आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी अशी आम आदमी पार्टीची इच्छा आहे. त्यानंतर आता मोदी विरूद्ध केजरीवाल असा सामना रंगतो का या चर्चेला उधाण आलं आहे.
सध्या ‘आप’ची नवी दिल्लीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी एक बैठक सुरू आहे. पक्षाचे उत्तर प्रदेशातले उमेदवार या बैठकीला उपस्थित आहेत. तर अरविंद केजरीवाल सध्या बंगळुरूमध्ये आहेत.
केजरीवाल यांनी ट्विटरवरून म्हटले आहे, ‘अनेक मला विचारताहेत की मी मोदींविरोधात निवडणूक लढवणार  का? या मुद्द्यावर मी आज बंगळुरूमधल्या सभेत स्पष्ट करेण.
मोदींचे नाव जाहीर होताच ‘आप‘ने केजरीवाल यांना वाराणसीतून उतरवण्याची चर्चा सुरू झाली होती. मोदी आणि केजरीवाल यांच्यात लढत झाल्यास देशातील सर्वात लक्षवेधी ठरणार आहे. उत्तर प्रदेशचे महत्त्व लक्षात घेऊन भाजपने नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. शनिवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मोदींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून केजरीवाल प्रस्थापित पक्षांविरोधात जोरदार टीका करत आहेत. मोदींविरोधात लढल्यास केजरीवाल आणखी काही दिवस चर्चेत राहणार हे स्पष्ट आहे.

  • virendra ghogare

    Its the time to show what an AAM ADMI can do to so called leaders of BJP & CONGRESS.

close