सण होळीचा; सण रंगांचा!

March 17, 2014 9:26 AM0 commentsViews: 190

17 मार्च :  आज धुळवड… राज्यातच नाही तर देशभरात सकाळपासून रंगांची उधळण सुरू झालीय. एकमेकांना लाल, हिरवे, निळे रंग लावत लोकांनी धुळवड साजरी करायला सुरुवात केलीय. संपूर्ण देशभर हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.

कुठे अबीर-गुलाल, कुठे रंग तर कुठे फुलांची होळीही खेळली जाते. काल होळी पौर्णिमाही देशात सर्वत्र उत्साहात साजरी झाली. आता ठिकठिकाणी रंगांची उधळन करायला सुरुवात झाली आहे.

डिजेच्या तालावर सगळेच थिरकतांना दिसताहेत.’बुरा ना मानो होली है’! असं म्हणत ऐकमेकांना रंग लावला जातो आहे.

close