सीपीएमचा निवडणूक जाहीरनामा जाहीर

March 16, 2009 10:15 AM0 commentsViews: 4

16 मार्च मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा जाहीरनामा जाहीर झालाय. या जाहीरनाम्यात मनमोहन सिंग याचं सरकार हे पूर्णपणे अमेरिका धार्जिणं असल्याची टीका सीपीएमनं केली आहे. जाहीरनाम्यात मनमोहनसिंगांच्या काळातलं भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे घोर फसवणूक असल्याचं म्हटलंय. लोकसभा निवडणुकानंतर सत्तेत आलो तर, अमेरिकेबरोबरचा अणुकरार नव्यानं करणार असल्याचं करात यांनी स्पष्ट केलं.अल्पसंख्याकाच्या समान अधिकारासाठी समान अधिकार आयोग स्थापन करणार. तसंच धर्मनिरपेक्षता प्रस्थापित व्हावी म्हणून सच्चर आयोगाच्या शिफारसी लागू करणार असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाच्या बिमोडासाठी इंटेलिजन्स एजन्सी आणि सुरक्षा एजन्सी यांच्या समन्वयावर भर देणार असल्याचं ते म्हणाले. तसंच निवडणुका झाल्यावर तिस-या आघाडीची ताकद काय आहे ते प्रणब मुखर्जी यांना कळेल, असाही टोला त्यांनी मुखर्जी यांना लगावला.

close