औरंगाबादला भेडसावेतय तीव्र पाणी टंचाई

March 16, 2009 3:15 PM0 commentsViews: 66

16 मार्च, औरंगाबाद माधव सावरगावेऔरंगाबाद शहराला पाणी टंचाई जाणवत आहे. कारण गेल्या दहा वर्षांपूर्वी फुटलेली पाण्याची पाईप लाईन अद्यापही अधिकार्‍यांनी दुरुस्त केलेली नाही. त्यामुळे या पाईपलाईनमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. फुटलेल्या पाईपलाईनमुळं औरंगाबाद शहरात अनेक भगात टँकरनं पाणी पुरवठा होत आहे. पाणी टंचाईविषयी आणि फुटलेली पाईप लाईन दुरूस्त करण्यासाठी अनेकवेळा नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारही केली. पण त्याचा उपयोग शून्य झाला. ज्या फुटलेल्या पाईप लाईनमधून दररोज पाणी वाया जातं ते 4 वॉर्डाला तरी पाणीपुरवठा होईल इतकं असतं. तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था औरंगाबाद महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची झाली आहे. एकीकडे समांतर जलवाहिनीसाठी प्रयत्न केले जातात मात्र दुसरीकडे फुटलेल्या जलवाहिनीला पाहण्यासाठी कुणीही रस्त्यावर येत नाही. पाईप लाईन फुटलीय हे औरंगाबाद महापालीकेलाच्या महापौरांना जरी मान्य असलं. तरी दुरुस्ती करण्यासाठी त्यांना भीती वाटतेय.अगोदरच आपण 1400 मिमीची पाईपलाईन शटडाऊन केल्यानं शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचणी आल्या.आता उन्हाळा आल्यानं दुरुस्ती करणं जरा अवघड वाटत आहे. पण ही दुरुस्ती करणं गरजेचं आहे, " असं महापौर विजया रहाटकर यांनी सांगितलं. दहा वर्षानंतर तरी या पाईपलाईनची दुरूस्ती व्हावी अशी औरंगाबादकरांनी अपेक्षा आहे.

close