आयसीसी क्रमवारीत धोणी पहिल्या स्थानावर

March 16, 2009 3:18 PM0 commentsViews: 21

16 मार्चभारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. आयसीसीनं वनडे बॅट्समनची नवी यादी जाहीर केली. त्यात बाजी मारलीय ती भारतीय बॅट्समननी. भारताचा धडाकेबाज ओपनर विरेन्द्र सेहवागनंही न्यूझीलंडमधल्या कामगिरीनंतर थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच तो टॉप टेन क्रमवारीत पोहचला आहे. न्यूझीलंडमध्ये त्यानं दमदार बॅटींग करत 299 रन्स केले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही तेराव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तो भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणी. त्यानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. युवराज सिंग मात्र तिसर्‍या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. पण वनडेतल्या ऑल राऊंडर खेळाडूंच्या यादित शोएब मलिकसह तो तिसर्‍या क्रमांकावर आहे.

close