शिवबंधनाचा धागा तोडून नार्वेकरांच्या हातावर राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’?

March 17, 2014 3:21 PM0 commentsViews: 944

rahul navrekar17 मार्च : शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राहुल नार्वेकर शिवबंधनाचा धागा तोडून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातावर बांधण्याची शक्यता आहे.  त्यांच्यासह आणखी एखाद्या शिवसेना नेत्याचाही राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो.

गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर आज (सोमवारी) दुपारी 3 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचं सुत्रांकडून समजतंय. आज धुलिवंदनाचा दिवस आहे. आणि त्यामुळे या चांगल्या दिवशी काहीतरी चांगलं घडावं असं आपल्याला वाटतं असं राहुल नार्वेकरांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलंय.शिवसेनेत अस्वस्थ असल्याची कबुलीही त्यांनी दिली.

close