आयपीएलच्या प्रसारण हक्कांवरून वाद

March 16, 2009 7:56 AM0 commentsViews:

16 मार्च आयपीएलचा दुसरा हंगाम क्रिकेट ऐवजी इतर कारणांनीच जास्त गाजतोय. स्पर्धेचे मुख्य ब्रॉडकास्टर सेटमॅक्स आणि आयोजक यांच्यातही प्रसारण हक्कांवरून भांडण सुरू आहे. आणि हे भांडण आता कोर्टात गेलंय. सोनी सेटमॅक्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीला प्रसारणाचे हक्क विभागून देता येणार नाहीत, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने यापूर्वीच दिलेत. गेल्यावर्षी आयपीएलच्या प्रसारणाचे सगळे हक्क सोनी सेटमॅक्सकडे होते. पण यंदा सेटमॅक्स बरोबरच रिलायन्सच्या बिग टिव्हीला हे हक्क विभागून विकण्यात येणार असल्याची बातमी आहे. आणि सेटमॅक्सची याला तयारी नाही. त्यावरून झालेल्या वादावादीनंतर शनिवारी आयपीएलने तडकाफडकी सेटमॅक्सचे हक्क रद्द केले. त्यावर सेटमॅक्सने कोर्टात धाव घेतली.

close