‘ बोक्या सातबंडे ‘चं म्युझिक लॉन्च केलं आजी-आजोबांनी

March 16, 2009 6:24 PM0 commentsViews: 8

16 मार्च, मुंबई रचना सकपाळआकाशवाणीसाठी लिहिलेलं नभोनाट्य, मग त्याचं पुस्तक नंतर मालिका आणि आता सिनेमा असा दिलीप प्रभावळकर यांच्या बोक्या सातबंडेचा प्रवास तसा मोठा आहे. नुकतंच बोक्या सातबंडे सिनेमाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम झाला. सिनेमाचं म्युझिक लाँच म्हणजे फिल्मी झगमगाट असतो. पण फिल्मी पद्धतीला छेद देत ' बोक्या सातबंडे 'चं म्युझिक रिलीज झालं आजी,आजोबा आणि नातवाच्या हस्ते. त्यावेळी दिलीप प्रभावळकर, रेखा कामत, शुभांगी जोशी, जितेंद्र जोशी, सचिन पिळगावकर आणि ' बोक्या…'तली बच्चेकंपनी उपस्थित होती. ' बोक्या सातबंडे 'चा म्युझिक लॉन्च सोहळा पहा व्हिडिओवर.

close