जावईबापूंची गाढवावरून वरात

March 17, 2014 8:50 PM0 commentsViews: 3879

17 मार्च : लग्नाच्या वेळेस घोड्यावरून मिरवणारा जावई धुळवडीच्या दिवशी चक्क गाढवावरून गावात मिरवली जातो. अशीच काहीशी दीडशे वर्षांची परंपरा ही केज तालुक्यातील विडा इथली…धुळवड सणाच्या निमित्ताने जावयाची गाढवा वरुन वरात काढण्यात येऊन अनोख्या पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात येते.”कुछ भी हो,बुरा ना मानो होली है…”

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा हे तीन हजार लोकवस्तीच गाव या गावात दरवर्षी धुळवडही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. या गावाची मागील दीडशे वर्षांची एक परंपरा आहे की, या गावातील जावयास ही चक्क धुळवडीच्या दिवशी चक्क गाढवा वरुन संपूर्ण गावातून मिरविण्यात येते. कधी काळी घोड्यावरुन वाजत गाजत मिरवलेला जावई धुळवडीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून मिरवला जातो. ही अनोखी परंपरा ग्रामस्थांनी आज ही चालू ठेवत असल्याच सरपंचांनी सांगितलंय. परंपरेचा एक भाग म्हणून आपण ही या समारंभात सहभागी झालो असून लग्नातील ती वरात आणि आजची ही वरात खूप वेगळी वाटत असल्याच जावई शांताराम पटाईत यांनी सांगितलं.

close