अखेर क्रिमिया ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित

March 18, 2014 10:12 AM0 commentsViews: 809

crimea18 मार्च : रविवारी घेण्यात आलेल्या सार्वमतात तब्बल ९७ टक्के नागरिकांनी युक्रेनमधून बाहेर पडूण्याच्या बाजूने कौल दिला आहे. क्रिमियाच्या संसदेने सोमवारी स्वातंत्र्याची घोषणा करणारा ठराव संमत केला. त्याला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली. त्यानंतर क्रिमियाने रशियन फेडरेशनमध्ये विलीन होण्यासाठी औपचारिक अर्ज केला. त्यासंबंधीच्या करारावर त्यांनी काल स्वाक्षरी केली.

यामुळे आता क्रिमियाचं रशियामध्ये विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला  आहे. युक्रेननं हे सार्वमत मानत नसल्याचं स्पष्ट केलंय, तसंच रशियाच्या राजदुतांना बोलावून घेतलंय. तर या घडामोडींनंतर अमेरिका आणि युरोपीय महासंघानं तीव्र नाराजी व्यक्त केलीये आणि पुतिन यांच्या महत्त्वाच्या सल्लागारांवर निर्बंध लादलेत. इतकंच नाही तर खुद्द पुतिन यांच्यावर निर्बंध लादायलाही कमी करणार नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय.

close