नितीन गडकरींचं केजरीवालांना खुलं आव्हान!

March 18, 2014 9:38 AM2 commentsViews: 3298

gadkari on kejri18 मार्च :  ‘नागपूरच्या मिहान प्रकल्पात आपली आणि मुत्तेमवार यांची असलेली पार्टनरशीप अरविंद केजरीवाल यांनी सिध्द करावी’ असं आव्हान भाजपचे माजी अध्यक्ष आणि नागपूरातले उमेदवार नितीन गडकरी यांनी केजरीवालांना दिलं आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी हे आव्हान दिलं.

‘केजरीवाल यांनी केलेले आरोप सिध्द झाले तर मी राजकारण सोडेन; नाहीतर केजरीवालांनी राजकारण सोडून असे आरोप करणं बंद करावं’ असंही गडकरी यांनी सांगितलं.

नागपूरात झालेल्या सभेत केजरीवाल यांनी मिहानमध्ये मुत्तेमवार आणि गडकरी यांची पार्टनरशिप आहे असा आरोप केला होता.

  • Shailesh pAtil

    KEJRIWAL DESHAVAR BOJ JHALA AAHE

  • amit kulkarni

    palkuta ahe kejriwal

close