आज जाहीर होणार काँग्रेसची तिसरी यादी?

March 18, 2014 12:24 PM0 commentsViews: 613

Congress and sonia18 मार्च :  काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्याता आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस वाराणसीतून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल उत्सुकता लगली आहे. त्याचं बरोबर, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या या सारख्या महत्वाच्या जागांसाठीही आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या काही महत्वांच्या मतदार संघातल्या उमेदवारांची नावं यात असतील अशी चर्चा आहे. यवतमाळ, लातूर, पुणे आणि नांदेड याबाबत उत्सुकता असून काँग्रेस या ठिकाणी कुठले उमेदवार देते याकडे लक्षं लागले आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार सुरू आहे, पण आज त्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता नाही. तर पी.चिदंबरम आणि सचिन पायलट हे निवडणूक लढवायला उत्सुक नसल्याची चर्चा आहे. काँग्रेसने आतापर्यंत 265 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

close