राष्ट्रवादीला धक्का, कपिल पाटील भाजपमध्ये

March 18, 2014 5:27 PM2 commentsViews: 5328

ncp_kapil patil_bjp18 मार्च : लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम फोडाफोडीच्या राजकारणाने चांगलाच रंगला आहे. ठाण्यातले राष्ट्रवादीचे नेते कपिल पाटील यांनी आज (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या आजच्या पत्रकार परिषदेत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थित कपिल पाटील यांनी प्रवेश केला. पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला धक्का बसलाय.

कपील पाटील यांचे ठाणे ग्रामीणमध्ये चांगले वर्चस्व आहे. भाजपमध्ये प्रवेशाच्या बदल्यात त्यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

  • Chavan Somnath Jagannath

    Hart Attack alay !

  • yash-1

    ya nivadnukila hi doghanchya bhandanat tisryacha labh honar……….

close