इशरत जहाँ प्रकरणी नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत

March 18, 2014 5:03 PM1 commentViews: 1471

Image img_234292_modi2323_240x180.jpg18 मार्च : लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत आले आहे. देशभर गाजलेल्या इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी गुजरात सरकारने तपासामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, अशा अर्थाचं गुजरातच्या काही मंत्र्यांचं आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचं संभाषण असणारी सीडी बाहेर आली होती.

आरोपपत्र असलेले पोलीस अधिकारी जीएल सिंघल यांनी ही सीडी सीबीआयकडे सोपवली होती. आता सीबीआयनं त्यासंबंधी प्राथमिक तपास नोंदवलाय. 15 जून 2004 ला अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी गुजरात पोलिसांनी केलेल्या चकमकीत 19 वर्षांची इशरत आणि तिच्याबरोबर असलेल्या 3 तरुणांचा मृत्यू झाला होता.

इशरत ही लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेची सदस्य आहे आणि नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तिला पाठवण्यात आल्याच्या संशयावरून ही चकमक करण्यात आली होती. पण, सर्वात आधी गुजरातच्या मेट्रोपोलिटन कोर्टाने ही चकमक बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर गुजरात हायकोर्टाच्या आदेशावरून आधी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी आणि त्यानंतर सीबीआयाने या प्रकरणी तपास केला. इशरत आणि लष्कर-ए-तोयबाचा काहीही संबंध या दोन्ही तपास संस्थाना आढळला नाही.

  • Shailesh pAtil

    saglya kutryni kiti hi prayatn kele tari kahi honar nahi

close