वरुण गांधींच्या भाषणाची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

March 17, 2009 6:16 AM0 commentsViews: 1

17 मार्च उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील एका सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी, वरुण गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सभेत वरुण गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या सीडी निवडणूक आयोगानं मागवल्या आहेत. त्यांचं भाषण ऐकून, दुपारी होणा-या मीटिंगमध्ये पुढील कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या देशात हिंदूना नेता नाही. मतासाठी त्यांना आमच्याकडे यावंच लागेल.तसंच हिंदूना लक्ष करणा-यांचे हात तोडून टाकू असं वरुण गांधी भाषणात बोलले होते.वरुण गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपमधूनच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. वरुण गांधींनी असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे.

close