धोणीचा झी मीडियाविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

March 18, 2014 9:02 PM0 commentsViews: 3962

dhoni 34518 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी यांनं आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणी झी मीडियावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय.बदनामी करणारं वृत्त दाखवल्याचा धोणीचा आरोप आहे. याविरोधात त्यांनं मद्रास हायकोर्टात 100 कोटींचा दावा दाखल केलाय.

धोणी मॅच फिक्सिंगमध्ये असल्याचं वृत्त आणि मुलाखत झी मीडियाने दाखवलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या धोणीने कोर्टात धाव घेतली. आपल्या संबंधीत सुरू असलेल्या बातम्या झी मीडियाने बंद कराव्यात अशी मागणी धोणीने कोर्टाकडे केली. कोर्टाने अंतरिम आदेश देत धोणी संबंधीत बातम्यांवर बंदी आणली आहे.

मॅच फिक्सिंगमध्ये धोणीच्या सहभागाच्या कोणत्याही बातम्या दाखवू नये असे आदेश कोर्टाने दिले आहे. माझ्या संबंधी ज्या बातम्या दाखवण्यात आल्यात त्या खोट्या आणि खोडसाळ आहेत. कोणताही तपास न करता पुराव्याशिवाय या बातम्या दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे माझी आणि टीमची बदनामी होत आहे असा आरोप धोणीने केलाय.

close