सावधान,एटीएममधून होत आहे पैसे चोरी !

March 18, 2014 10:06 PM0 commentsViews: 5356

18 मार्च : बँकेच्या एटीएममधून आपण नेहमी विश्‍वासाने आपल्या खात्यातून पैसे काढतो. पण आता एटीएमवर विश्‍वास ठेवायचा की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. मुंबईत आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनमधून खातेदारांचे पैसे परस्पर लंपास करणारी टोळी दरोडे टाकत आहे. त्यामुळे खातेदार चिंताग्रस्त झालेत तर सुरक्षा यंत्रणांना अजूनही या दरोडेखोरांना पकडता आलेलं नाहीये.

भांडुपला राहणार्‍या हनुमंत गायकवाडचं अभ्युदय बँकेत खातं आहे. बँकेचं एटीएम कार्ड वापरून दुसर्‍या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढता येतात म्हणून हनुमंतने आयसीआयसीआय बँकेतल्या एटीएममधून पैसे काढले. पण नंतर आपल्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचं समजलं. या चोरी प्रकरणी भांडुप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी एटीएम मशिनमधल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू केलाय. पण अजून चोरांना पकडता आलेलं नाही. पोलीस यासंदर्भात प्रतिक्रिया द्यायला नकार देत आहे. भांडुपच्या या एटीएममधून 25 खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास करण्यात आले आहेत. त्यामुळे आयसीआयसीआय बँक खातेदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यास असमर्थ ठरतेय.

close