‘नीट काम करा नाहीतर निवडणुकीनंतर पाहून घेईन’

March 18, 2014 10:41 PM3 commentsViews: 7280

18 मार्च : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांमुळे याआधी अनेक वेळा अडचणीत आलेत. आधी बेताल वक्तव्यं करायची आणि मग त्याचं खापर मीडियावर फोडायचं ही त्यांची जुनी सवय. मावळचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या तळेगावमध्ये झालेल्या सभेत तर अजित पवारांचा दांडपट्टा आपल्याच कार्यकर्त्यांवर चालला. निवडणुकीच्या काळात निष्ठेनं काम केलं नाहीत तर आचारसंहिता संपल्यावर एक-एकाला बघून घेईन, नंतर कुणी माफी मागायला यायचं नाही. माफी वगैरे काही मिळणार नाही असा दमच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भरला. दादा एवढ्यावर थांबले नाही. मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि माझ्या वाटेमध्ये जर कुणी आलं तर मी आणि माझा चुलता (शरद पवार) यांच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. साहेब सबुरीने घेतात. मी, वेगळ्या पद्धतीने घेईन मग तुम्हाला बरंच काही आठवेल त्यामुळे अशी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असंही पवार बजावून सांगितलं. तसंच ज्यांना पवार साहेब आणि आम्ही ज्यांना उभं केलं आहे (राहुल नार्वेकर) त्यांच्यासाठी शेवटपर्यंत काम केलंच पाहिजे. अजित पवार जशी पदं देऊ शकतो तशी खड्यासारखी बाजूला काढूनही घेऊ शकतो असा इशाराही पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

 • Chavan Somnath Jagannath

  Raj Thakre che Ashi News Dilyawar Channel Phodatat

 • Varadraj

  Mhanje NCP cha umedvar padnar he Ajit Pawarnahi mahitiye.

 • Vikas Karde Gurav

  IBN Lokmat He sarvsadharan lokanche hakkchi midia ahe
  ani te hi sarv netyanbaddal mahiti deta
  shivsena aso va MNS aso va BJP aso va congress rashtravadi aso

  आम्हाला अभिमान आहे मराठी
  IBN लोकमत चा

close