प्रियकराला भेटण्याचे साहस एका तरुणीच्या जीवावर बेतले

March 19, 2014 9:24 AM0 commentsViews: 5940

kolhapur crime19 मार्च :  प्रियकराला भेटण्याचे साहस एका 17 वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतले आहे.  बिल्डींगच्या टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डन इमारतीत ही घटना घडली. अरुणा अनिल नंबियार असे मृत तरुणीचे नाव आहे. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती.

प्रियकराला भेटण्यासाठी टेरेसचा दरवाजा बंद असल्याने कठड्यावरून दुसर्‍या टेरेसवर जाण्याचे साहस या तरुणीने केले. हा प्रयत्न तिच्या जीवावर बेतला आहे. कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद  केली आहे.

मात्र हा अपघात आहे की आत्महत्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

close