दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार

March 17, 2009 7:06 AM0 commentsViews: 1

17 मार्च आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मान अखेर दक्षिण आफ्रिकेला मिळाला आहे. आयसीसीनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे. पाकिस्तानातून चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द झाल्यावर ती श्रीलंकेत होणार होती. पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्पर्धेवर पावसाचं सावट असल्यामुळे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आयसीसीचे कार्यकारी अधिकारी हरून लोगार्ट यांनी दक्षिण आफ्रिकेला स्पर्धा आयोजनाची ऑफर दिली. आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानंही ती स्वीकारली. आता 24 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगेल. सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून हलवण्यात आली होती.

close