अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंचा शिवसेनेत प्रवेश

March 19, 2014 12:51 PM0 commentsViews: 2583

Amol Kolhe shivsena19 मार्च :   आज शिवजयंतीच्या मुहर्तावर अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना हा शिवरायांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे म्हणून तो माझा पक्ष आहे अशी प्रतिक्रिया डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे महाराष्ट्रभर ओळख मिळाली. नागरिकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला.  आज शिव जयंतीचे औचीत्य साधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते. ते निवडणूक लढणार नसले तरी आगामी लोकसभा निवडणूकीत ते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत.

‘शिवसेना पक्ष हा शिवाजी महाराजांचा विचार असणारा पक्ष आहे. महाराजांनी वाट लावली नाही तर वाट दाखविण्याचे काम केले. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा पक्ष असल्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.’

मनसेकडूनही मला प्रस्ताव होता. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा होती. महाराष्ट्राची वाट लावणार्‍यांसोबत नाही तर महाराष्ट्राला वाट दाखवणार्‍यांसोबत येतोय , असेही कोल्हे म्हणाले.

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

close