आत्महत्येचा आकडा खोटा

March 19, 2014 3:42 PM0 commentsViews: 116

19 मार्च :   एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायेत… सरकारकडून मदतीची अपेक्षा करतायेत… पण काही राजकारणी मात्र आपल्याच धुंदीत गुंग आहेत. आत्महत्येचं प्रमाण वाढतेय असं म्हणणं खंर नाही, असं धक्कादायक वक्तव्य केलंय राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी. सरकार मोठ्या प्रमाणावर मदत देतं. मात्र काहीजण सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटा प्रचार करतायाते, असा आरोप विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये केलंय.

close