हीना गावितांचा आज भाजपमध्ये प्रवेश ?

March 19, 2014 2:54 PM1 commentViews: 1488

6443heena gavit19 मार्च : वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित आज (बुधवारी) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत हीना गावित भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राज्यातील भाजपचे बडे नेतेही आज दिल्लीत आहेत.

त्याचबरोबर राज्यातल्या लातूर आणि पुण्याच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. धुळे आणि रावेरचा उमेदवार बदलायाचा का ? यावरही अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि इतर महत्त्वाचे नेते दिल्लीत आहेत.

विशेष म्हणजे आपली मुलगी हीना गावित यांना भाजपतर्फे उभं करावं आणि काँग्रेसचा खासदार बदलावा ही जनतेचीच मागणी होती, असा दावा डॉ. विजयकुमार गावित यांनी केलाय. मात्र हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विजयकुमार गावित यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तसा इशाराच दिलाय. तर हीना गावितांचा भाजप प्रवेश हा दुदैर्वी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसंच गावितांवर अन्याय झाला नाही असं सुळे यांनी स्पष्ट केलं.

  • Sachin Nalawade

    Maharashtrachi Mayawati!

close