बिहारमध्ये लालू आणि पासवान एकत्र

March 17, 2009 7:41 AM0 commentsViews: 2

17 मार्च बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान एकत्र आले आहेत. लालूप्रसाद यांची राष्ट्रीय जनता दल लोकसभेच्या 25 जागा लढवेल तर पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी 12 जागांवर उमेदवार उभे करील. तसंच काँग्रेससाठी या दोन पक्षांनी तीन जागा सोडल्या आहेत. या जागावाटपाच्या समझोत्यामुळे बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजपच्या आघाडीला टक्कर देण्यासाठी हे तीन पक्ष सज्ज झाले आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या पार्टीला 22 जागा मिळाल्या होत्या. पासवान यांच्या पार्टीला चार जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. झारखंडमध्येही लालू आणि पासवान एकत्र लढणार आहेत.

close