कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीनं तीव्र निदर्शन

March 17, 2009 10:38 AM0 commentsViews: 3

17 मार्च बेळगाव महापालिकेचं कार्यालय सोमवारी नवीन इमारतीत स्थलांतरीत झालं. नवीन इमारतीवर फक्त तिरंगा लावण्याचे आदेश कर्नाटक सरकारनं दिले. सरकारच्या या निर्णयाला मराठी भाषिकांनी तीव्र विरोध केला.कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीनं शिवाजी चौकात तीव्र निदर्शन करण्यात आली. कर्नाटक सरकार मराठी माणसांची गळचेपी करण्यासाठी अशा प्रकारचं कारस्थान करत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. पण कोणत्याही परिस्थितीत बेळगावच्या महापालिका इमारतीवर भगवा ध्वज फडकला पाहीजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. गेल्या 51 वर्षांपासून फडकत असलेल्या भगवा ध्वज महापालिका इमारतीवर न फडकवणे म्हणजे मराठी माणसाचा आपमान असल्याचही शिवसैनिकाचं म्हणणं आहे.

close