राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

March 19, 2014 8:56 PM1 commentViews: 1309

19 मार्च : आत्महत्येचं प्रमाणं वाढतंय असं म्हणणं खरं नाही, आत्महत्याची घटना सरकारला बदनामा करण्याचा कट आहे असं धक्कादायक वक्तव्य करून राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. मात्र आपल्या विधानामुळे गोंधळ उडाल्यामुळे विखे पाटलांनी शेतकर्‍यांनी माफी मागितली. माझ्याकडून शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या मनात शेतकर्‍यांबाबत अशा काही भावना नव्हत्या असं विखे पाटील म्हणाले. मंगळवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटलांनी आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या घटना ह्या सरकारला बदनामा करण्याचा कट आहे असा आरोपच विखे पाटलांना केला होता. मात्र आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल आयबीएन-लोकमतशी बोलताना विखे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली.

  • umesh jamsandekar

    अगोदरच जनतेच्या प्रश्नावर उदासीन असलेल्या सरकारची कोण बदनामी करणार. ज्याच्या पोटात भूक आणि डोक्यावर कर्जाच ओझ असत तो माणूस काय राजकारण करणार तेव्हा त्या मृत शेतकऱ्यांना मृत्यूनंतर यातना होतील असे वक्तव्य करू नका. भिक नको पण कुत्र आवर अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आणू नका अशी माझी विनंती आहे.

close