मोदी बडोद्यातूनही रिंगणात,उमेदवारीमुळे अडवाणी नाराज?

March 19, 2014 10:35 PM1 commentViews: 1650

3453 modi and advani news19 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन आखाडे तयार केले आहे. नरेंद्र मोदी दोन मतदारसंघातून लढणार आहे. वाराणसीनंतर गुजरातमधल्या बडोद्यातून मोदींना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे मोदी आपल्या होम टाऊनमधूनही निवडणूक लढवणार आहे.

नवी दिल्लीत भाजपने आपल्या 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पण अडवाणींना भोपाळमधून उमेदवारी हवी होती. गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अडवाणी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. नाराज अडवाणींची नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांनी भेट घेतलीय.

तर जसवंत सिंग यांना गुजरातमधल्या दाहोदमधून उमेदवारी देण्यात आलीय. मात्र जसवंत सिंग यांना राजस्थानमधल्या बारमेरमधून उमेदवारी हवी होती. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल वाराणसीतून निवडणूक लढवतील अशी घोषणा केलीय. पण यासाठी अंतिम निर्णय हा 23 मार्चला जाहीर करतील असं सांगण्यात आलंय. केजरीवाल वाराणसीतून निवडणूक लढवणार यामुळे भाजपच्या गोटात चिंता पसरली होती. तर दुसरीकडे काँग्रेसनेही वाराणसीतून काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सेफ गेम म्हणून भाजपने मोदींनी बडोद्यातून उमेदवारी जाहीर केलीय.

  • pravin

    Modiji ek hi sit se ladna chahiye! Vo sher hai vikas purush hai hava hai lahar hai fir do sit kyu?

close