नरेंद्र मोदी आज विदर्भ दौर्‍यावर; गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची घेणार भेट

March 20, 2014 9:26 AM0 commentsViews: 553

narendra_modi_1390028052_540x54020  मार्च :  नरेंद्र मोदी आज दुपारी विदर्भाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. दुपारी त्यांची वर्ध्यात जाहीर सभा होईल. त्याआधी ते बापू कुटीला भेटही देणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या दाभाडीमध्ये ते गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेणार आहे आणि यावेळी चाय पे चर्चा हा कार्यक्रमही होईल. 1500 लोकवस्ती असलेल्या या गावात ते आत्महत्या केलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाशी संवाद साधणार आहेत. मोदींच्या आगमनासाठी जय्यत तयारी झाली असून या छोट्याशा गावात कधी नव्हे एवढी वर्दळ सुरु आहे. त्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोदी आत्महत्याग्रस्त कुंटुंबातील विधवा महिलांशी संवाद साधणार आहेत. गेल्या 4-5 वर्षात एकट्या दाभाडी गावातील प्रकाश राठोड,दिलीप डिके,दत्त राठोड,त्रिवेणी गुल्हाने, सुमन सरोदे,बाबूसिंग राठोड,गोपाल दाभाडकर,दामू राठोड या 8 शेतकर्‍यांनी नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानामुळे स्वत:च आयुष्य संपवल. हे सर्व परिवार आज असह्य जीवन जगतायत.काही शेतकर्‍यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून1लाखाची मिळालेली मदत त्यांना पुरी पडली नाही, आता त्यांना मोदींकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

close