बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले?

March 20, 2014 11:41 AM0 commentsViews: 16620

airelines20 मार्च :  मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचं गूढ अजूनही कायम आहे. याचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे, आणि रोज नवनवीन माहिती उघड होत आहे. विमानाचे वैमानिकाच्या फ्लाइट स्टिम्युलेटरवरचा डेटा नष्ट झाल्याचं मलेशियाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. आता तो डेटा पुन्हा मिळवण्यासाठी एफबीआय या अमेरिकी गुप्तहेर संघटनेची मदत घेतली जाते आहे.

मलेशिया एअरलाईन्सचं विमान बेपत्ता होऊन दोन आठवडे झालेत. अद्याप या प्रकरणी कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही. मात्रा या विमानाचे अवशेष सापडले असल्याची शक्यता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान  टोनी अबॉट यांनी सांगितले आहे. हिंदी महासागराच्या दक्षिणेकडे काही वस्तू दिसत असल्याचं ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले आहे. या वस्तू विमानाचे अवशेष असू शकतात असा दावा ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आला आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून हे अवशेष दिसले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या या दाव्यानंतर मलेशियन नौदलाने 6 जहाजं आणि 3 हेलिकॉप्टर्स या अवशेषांच्या शोधासाठीरवाना झाले आहेत. अमेरिकी नौदलाची विमानंही या अवशेषांच्या शोधासाठी सज्ज आहेत. मात्र दृष्यमानता कमी असल्याने शोधामध्ये अनेक अडचणी येत आहेत.

मलेशिन एअरलाइन्स कंपनीचे बोईंग 777 प्रकारचे एमएच 370 हे विमान 8 मार्चपासून बेपत्ता झाले आहे.  239 प्रवासी या विमानात आहेत. चीनला निघालेल्या या विमानाने मलेशियातून  उड्डाण केल्यानंतर हे विमान समुद्राच्या दिशेने गेले. पुढे समुद्रावरुन मोठा पल्ला पार करुन विमान चीनच्या हद्दीत प्रवेश करणार होते. मात्र समुद्रावरुन प्रवास करत असतानाच विमान राडारवरुन गायब झाले. विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

close