शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील चार आरोपी दोषी

March 20, 2014 12:48 PM0 commentsViews: 806

shakti mill20  मार्च :  महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी टेलिफोन ऑपरेटर आणि पत्रकार महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारातील आरोपींना सत्र न्यायालयाने आज (गुरुवार) दोषी ठरवले आहे. त्यांना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

शक्ती मिलमधील महिला छायाचित्रकारावर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये; तर कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलीवर जुलैमध्ये बलात्काराची घटना घडली होती. कासिम बंगाली, विजय जाधव, सिराज खान, मोहम्मद अन्सारी या चार आरोपींवरचे दोष सिद्ध झाले.

किला कोर्टाने आज या दोन्ही खटल्याच्या आरोपींना दोषी ठरवलं आहे. विशेष म्हणजे हा निकाल 7 महिन्यांत देण्चात आला आहे. न्यायालयात सुनावणीवेळी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.

या खटल्यात 5 आरोपी होते, आणि पोलिसांनी यात 600 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात सरकारी पक्षाने 31 साक्षीदार तपासलेत तर आरोपींच्या वकीलानं एक साक्षीदार तपासला. ऑगस्ट 2013मध्ये एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. यानंतर मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. याच परिसरात याच प्रकरणातल्या आरोपींनी या घटनेआधी काही महिन्यांपूर्वी आणखी एका टेलिफोन ऑपरेटर मुलीवर अशाच प्रकारे बलात्कार केल्याचं तपासा दरम्यान उघड झालं होतं. हे दोन्ही खटले कोर्टात एकत्र चालवण्यात आले.

close