ज्येष्ठ लेखक, संपादक खुशवंत सिंग यांचं निधन

March 20, 2014 1:47 PM0 commentsViews: 295

khushwant singh20  मार्च : ज्येष्ठ लेखक खुशवंतसिंग यांचे वयाच्या ९९ वर्षी निधन झाले आहे. ‘ट्रेन टू पाकिस्तान’ सारख्या संवेदनशील पुस्तकासह ‘हिस्ट्री ऑफ द सिख्स’,  ‘देली – अ नॉव्हेल’, ‘विमेन ऍण्ड मेन इन माय लाईफ’  या सारखे अनेक जागतिक दर्जाची पुस्तकं अतिशय गाजली आहेत. ते अनेक वर्ष हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक होते. त्याशिवाय खुशवंत सिंग राज्यसभेचे माजी खासदार होते.

1984च्या शीख दंगली आणि शिखांची कत्तल याचा त्यांनी कडाडून विरोध केला होता. काँग्रेस सरकारवर त्यावेळी त्यांनी सडकून टीका केली होती. ‘देली – अ नॉव्हेल’ या पुस्तकातून दिल्लीचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं सांगितला.

खुशवंतसिंग यांना 2007 साली पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले होते. नामांकित पत्रकार, प्रचंड ताकदीचा लेखक व सह्रद व्यक्ती अशी ओळख असलेले खुशवंतसिंग अभ्यासपूर्ण व खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांचे गुरुवारी वृद्धापकालाने निधन झाले आहे.  आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येतील

close