कॉपी प्रकरणामुळे मुंबईतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

March 17, 2009 2:00 PM0 commentsViews: 4

17 मार्च, मुंबई दहावीच्या परीक्षेत कॉपी करताना पकडल्या गेल्यानंतर मुंबईत एका मुलीनं आत्महत्या केली. भावी देसाई असं या मुलीचं नाव असून ती मुंबईत घाटकोपर इथे राहत होती. बुधवारी सकाळी 11.00 वाजता घाटकोपरच्या गरोडिया नगरातील पुणे विद्या भवन शाळेत भावी भूगोलचा पेपर देण्यासाठी गेली होती. त्यावेळी परीक्षा केंद्रावर तिला कॉपी करताना पकडण्यात आलं. त्यानंतर भावी सारीना अपार्टमेंटमधल्या आपल्या घरात न येता सरळ बिल्डींगच्या गच्चीवर गेली आणि तिनं सातव्या मजल्यावरून उडी घेतली. त्यामुळे भावीचा जागेवरच मृत्यू झाला. पंतनगर पोलीस या प्रकरणी शाळा प्रशासनाकडे अधिक चौकशी करताहेत.

close