स्पाईस जेटमध्ये ‘बलम पिचकारी’वर धिंगाणा, 2 पायलट निलंबित

March 20, 2014 2:13 PM0 commentsViews: 6058

234spice jet20 मार्च : तुम्ही विमानाने प्रवास करताय आणि विमानातील क्रू मेंबर ‘फ्लॅश मॉब’ सारखा प्रकार करून अचानक सर्वांसमोर येऊन बिनधास्त नाचताय, गातायत. पण हा प्रकार घडलाय स्पाईस जेटमध्ये. गेली दोन दिवस इंटरनेटवर क्रु मेंबरच्या डान्सच्या या व्हिडिओने धमाल उडवून दिलीय.

त्याचं झालं असं की, धुळवडीच्या दिवशी स्पाईस जेटच्या गोवा-बंगलोर विमानामध्ये केबिन क्रूनं ‘बुरा न मानो होली है’ असं म्हणत विना रंगाची होळी खेळली. यावेळी क्रु मेंबरनी “बलम पिचकारी” या गाण्यावर ताल धरला. या संपूर्ण प्रकाराचं कॉकपिटबाहेर आलेल्या को-पायलटने चित्रिकरण केलं.

या संपूर्ण प्रकारामुळे विमानातल्या प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा निर्माण झाली. या प्रकरणी स्पाईस जेटला नोटीस बजावण्यात आलीय. यासाठी स्पाईस जेटचं लायसन्स रद्द का करू नये अशी विचारणाही करण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर दोन्ही वैमानिकांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. दरम्यान, संबंधित तपासामध्ये संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन विमान कंपनीकडून देण्यात आलंय.

close