शेतकर्‍यांची दुरवस्था काँग्रेसमुळेच – मोदी

March 20, 2014 6:50 PM0 commentsViews: 1479

modi in vardha20 मार्च : भाजपचे पंचप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी वर्ध्यामध्ये सभा घेतली. आणि शेतकरी आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून काँग्रेस, केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली. शेतकर्‍यांची आणि जवानांची दुरवस्था काँग्रेसमुळेच झाली आहे अशी टीका मोदींनी केली.

तसंच शेतकरी एकीकडे आत्महत्या करत आहेत. पण सरकार मात्र हातावर हात धरून शांत बसलेलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. बँका शेतकर्‍यांना कर्ज देत नाहीत, त्यामुळेच त्यांना सावकाराकडे जावं लागतं, असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, वर्ध्यातल्या सभेपूर्वी नरेंद्र मोदींनी बापू कुटीला भेट दिली. मोदींच्या भेटीला सेवाग्राम समितीचे सचिव आणि गांधीवाद्यांनी आक्षेप घेतला होता. गुजरात दंगलीप्रकरणी मोदींनी आधी प्रायश्चित घ्यावं मग घ्यावं आणि मग बापू कुटीत यावं, अशी अपेक्षा तिथल्या गांधीवाद्यांनी व्यक्त केली होती. पण मोठ्या वादानंतरही मोदी बापू कुटीत गेले. त्यानंतर ते यवतमाळकडे रवाना झाले. तिथं ते गारपीटग्रस्त शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहेत.

close