अडवाणींचे नाराजीनाट्य संपले, गांधीनगरमधून लढणार !

March 20, 2014 7:00 PM0 commentsViews: 1476

lalkrushna advani _420 मार्च :  भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमोर अखेर पक्ष नेतृत्वानं नमतं घ्यावं लागलंय. अडवाणी भोपाळ किंवा गांधीनगर कुठूनही लढू शकतात असं, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. पण त्यानंतर लालकृष्ण अडवाणींना आपली नाराजी दूर झाली असून आपण भोपाळमधून निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं

.पक्षाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य असून गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचं अडवाणींनी स्पष्ट केलं. अडवाणींनी निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली.

गांधीनगरमधून उमेदवारी घोषित झाल्यानं अडवाणी नाराज होते. आज (गुरूवारी) सकाळपासून मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अडवाणी हरीन पाठक या जवळच्या सहकार्‍यासाठी अहमदाबाद पूर्वेची जागा मिळावी यासाठी आग्रही आहेत. पाठक सध्या याच मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघासाठी अजून कोणाच्याही नावाची घोषणा झालेली नाही.

2009 साली ही जागा पाठक यांना द्यायला मोदींनी विरोध केला होता. आता अडवाणींचा हा आग्रहही पक्ष मानतोय का ते लवकरच कळेल. बुधवारी रात्री भाजपने पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांना बडोद्यातून उमेदवारी देण्यात आलीय. तर अडवाणींना गुजरातच्या गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण अडवाणींना भोपाळमधून लढण्याची इच्छा होती. पण पक्षांने त्यांना गांधीनगरमधून उमेदवारी दिली. पण अडवाणी नाराजीस्त्र काढल्यामुळे भाजपच्या नेत्यांना अखेर नमतं घ्यावं लागलंय.

close