राज्याच्या अर्थसंकल्पात पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 126 कोटी रुपयांची तरतूद

March 17, 2009 2:01 PM0 commentsViews: 2

17 मार्च राज्याचा हंगामी अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज विधानसभेत सादर केला. आज जाहीर झालेल्या या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केलं. जगावर आर्थिक मंदीचं सावट असतानाही या अंतरिम अर्थसंकल्पात विकास योजनांच्या आर्थिक तरतुदीत कोणतीही घट केली नसल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तर विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मात्र या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.या अर्थसंकल्पातला लक्षवेधी मुद्दा आहे तो राज्याच्या सुरक्षेचा. एनएसजी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर फोर्स-वन गटाची स्थापना करण्यात येणार असल्याचं वळसे-पाटील यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. राज्यातल्या पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 126 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर पोलीस दलात 11 हजार 21 पदं नव्यानं तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी 347 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या उत्पन्नामध्ये 2008- 2009 या वर्षात 6.7 टक्के वाढ अपेक्षित आहे, असं त्यांनी या हंगामी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.

close