अरूण जेटलींचा केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीवर बहिष्कार

March 17, 2009 5:24 PM0 commentsViews: 1

17 मार्चभाजपमधली धुसफूस वाढत चालली आहे. भाजपचे सरचिटणीस अरूण जेटली यांनी आज पुन्हा पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने जेटली गेल्या दोन आठवड्यांतील बैठकींपासून दूर राहिले होते. उद्योगपती सुधांशू मित्तल यांची पूर्वेत्तर राज्यांच्या सहप्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यावरूनच जेटली नाराज झालेत. मित्तल यांची हकालपट्टी केल्याशिवाय बैठकींना हजर राहणार नाही, असं जेटली यांनी पक्षाध्यक्षांना ठणकावून सांगितलंय. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग आणि सरचिटणीस अरूण जेटली यांच्यातले मतभेद मिटवण्याचे प्रयत्न सर्वच जण करत होते. पण यात यश आलेलं नाही

close