कर्जामुळे दोन शेतकर्‍यांनी केली आत्महत्या

March 21, 2014 9:31 AM0 commentsViews: 335

farmer suicide21 मार्च :  गारपीटग्रस्तांसाठी सरकारने पॅकेज जाहीर केलं खरं परंतु, हे पॅकेज पुरेसं नाही. त्यातच बँकांचा कर्ज भरण्यासाठी सुरू असलेला तगादा यांमुळे उद्ध्वस्त झालेला बळीराजा आयुष्य उधळून देत आहे. आज आणखी दोन शेतकऱ्यांनी स्वतःचं आयुष्य संपलं.

जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यानं आत्महत्या केली आहे. भास्कर पाटील या शेतकर्‍यानं रेल्वेखाली जीव दिला. त्यांचं वय 58 वर्ष होतं. गारपीटात गव्हाच्या पिकाचं नुकसान झालं होतं. त्यांच्यावर विकास सोसायटीचं 40 हजार कर्ज होतं.

तर, अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील चाकूर इथे गारपीटग्रस्त शेतकर्‍याची आत्महत्या केली आहे. गणेश खंडारे या शेतकर्‍याची काल दुपारी विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्यावर 50 हजारांचं बँकेचं कर्ज, तसचं सावकाराचंही 50 हजारांचं कर्ज होतं.

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारनं दिलेल्या पॅकेजला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. एकूण 4 हजार कोटींचं पॅकेज शेतकर्‍यांना जाहीर करण्यात आलं आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंतचं सगळ्यांत मोठं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलंचं राज्याचे मुख्य सचिव जे.एच सहारिया यांनी सांगितलं आहे. पण, दुसरीकडे विरोधकांनी मात्र ही मदत अपुरी असल्याचा आरोप केला आहे. सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतरही या आत्महत्या होत असल्याने सरकारने पॅकेजची रक्कम वाढवावी अशी मागणी सर्व स्तरावरुन करण्यात येत आहे.

close