मोदींविरोधात उमेदवारीवरून सेनेत संभ्रम

March 21, 2014 11:14 AM0 commentsViews: 4401

narendra modi meet udhav thakare 21 मार्च : नरेंद्र मोदींविरोधात उमेदवार उभा करायचा की नाही यावरून शिवसेनेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने राज्याबाहेर मात्र भाजपच्या विरोद्धात लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वाराणसीत मोदींविरोधातही शिवसेना उमेदवार देणार असं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ANI या वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितलं आहे. पण यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर शिवसेना पक्षाने आता घूमजाव केले.

तर दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार नाही असे स्पष्टीकरण ट्विटरवर दिले आहे.

aditya - rajdeep T

पण हा गोंधळ इथेच थांबला नाही. संजय राऊत यांनी काही वेळातच जाहीर केलं की ‘मोदींविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील. मात्र उत्तर प्रदेशात 20 जागा भाजपविरोधात लढवण्यावर ते ठाम आहेत.’

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने यंदा पहिल्यांदाचं पंजाबमधून २, दिल्लीमधून ५, बिहारमधून ५ तर उत्तरप्रदेशमधून २० जागांवर उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत आमची युती महाराष्ट्रात असून महाराष्ट्राबाहेर आम्ही स्वबळावरच निवडणूक लढवू असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.

राज्यात नरेंद्र मोदी व भाजपचे गोडवे गाणा-या शिवसेनेने आता देशभरात भाजपलाच आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोंदीच्या पाठिंब्याने काही दिवसांपूर्वी गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाचे संबंध ताणले गेले आहेत. अशातच हा नवा वाद निर्माण झाल्याने ते अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.

close