उमा भारतींची पुन्हा भाजपशी जवळीक

March 17, 2009 5:26 PM0 commentsViews: 1

17 मार्चभारतीय जनशक्ती पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी पुन्हा भाजपशी संधान साधण्याचा प्रयत्न केला आहे. उमा भारती यांनी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना पत्र लिहिलंय. अडवाणी यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पाहण्याची आपली इच्छा असल्याचं उमा भारतींनी पत्रात म्हटलंय. उमा भारती यांनी चार वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. अडवाणी यांच्यावर त्यांनी वेळोवेळी तोफ डागलीय. अडवाणी यांच्या नेतृत्वाला आव्हान देत 2004 मध्ये उमा भारती भाजपच्या बैठकीतन बाहेर पडल्या होत्या.

close