विमानाच्या शोधात ‘त्या’ ठिकाणी पथक पोहचले

March 21, 2014 2:19 PM0 commentsViews: 7355

 malaysian airline mh 37021 मार्च : गेल्या आठवड्यांपासून बेपत्ता मलेशियन एअरलाईन्सच्या विमानासाठीची शोधमोहीम आज (शुक्रवारी) पुन्हा सुरू करण्यात आलीय. विमानाचे अवशेष सापडले असा अंदाज व्यक्त केला गेला होता त्याठिकाणी आता शोधपथक पोहचले आहे.

हिंदी महासागराच्या दक्षिणेकडे गुरुवारी उपग्रह छायाचित्रात काही अवशेष सदृश्य गोष्ट पाहण्यात आली होती. ही वस्तू बेपत्ता विमान असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन सरकारने केलाय. ज्या ठिकाणी हे अवशेष सापडले त्याठिकाणी खराब हवामानामुळे पोहचण्यास अडथळे येत आहेत. मात्र आज ऑस्ट्रेलियन सरकारने समुद्राच्या या दुर्गम भागात 5 विमानं पाठवलेली आहेत.

त्यातलं एक विमान या जागी पोचलेलं आहे. पर्थपासून नैऋत्येला 2500 किलोमीटर वर असणारी ही जागा पृथ्वीवरच्या सगळ्यात दुर्गम भागांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाने दोन सॅटलाईट छायाचित्र जारी केली होती ज्यात साधारण 79 फूट लांबीची एक वस्तू दिसून येत होती. हेच या बेपत्ता विमानाचे अवशेष असावेत असा कयास आहे. या शोधमोहिमेत भाग घेण्यासाठी भारतीय हवाई दलाचीही 2 विमानं यात सहभागी होणार आहेत.

या विमानात एकूण 239 प्रवाशी आहे. आता ज्या ठिकाणी विमानाचे अवशेष सापडले त्या ठिकाणी पथक पोहचले आहे आता ती वस्तू खरंच बेपत्ता विमान आहे की त्याचे अवशेष आहे ? जर असेल तर विमानाचं काय झालं ? विमानातील प्रवाशांचं काय झालं ? याची उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

close