टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाक महामुकाबला

March 21, 2014 5:14 PM0 commentsViews: 1348

ind vs pak21 मार्च : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे जणू दुसरे युद्धचं…आणि या युद्धची मेजवानी आज (शुक्रवारी) टी-20 वर्ल्डकपमध्ये मिळणार आहे.

टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी भारत विरुद्ध पाक या सामन्याने धमाक्यात सुरुवात होणार आहे. 2007चे चॅम्पियन असणार्‍या भारतीय टीमचा मुकाबला हा 2009 चे चॅम्पियन पाकिस्तानशी मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये होणार आहे.

आजपर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानच्या विरोधातल्या सगळ्या मॅचेस जिंकलेल्या आहेत. पण अलीडकडे आशिया कपमध्ये शाहीद आफ्रिदीने धडाकेबाज खेळी करत भारताला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे भारत या पराभवाचा वचपा काढणार का याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलंय.

close