नाराजीच्या दलदलीत सापडले ‘कमळ’, जसवंत सिंग बंडाच्या पवित्र्यात

March 21, 2014 9:39 PM0 commentsViews: 922

jaswant singh_bjp21 मार्च : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीनाट्यावर पडदा पडल्यानंतर आणखी एका नाराजीनाट्याला सुरूवात झालीय. आता भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग नाराज झाले आहे.

जसवंत सिंग यांची मागणी धुडकावत भाजपने बारमेरमधून कर्नल सोनाराम चौधरी यांना उमेदवारी दिलीय. जसवंत सिंग यांनी ही शेवटची लोकसभेची निवडणूक असल्याने स्वतःच्या राज्यातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी बारमेरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली होती.

उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून बारमेरमधून निवडणूक लढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र त्यांची ही मागणी पक्षाकडून पूर्ण झालेली नाही. ते सध्या पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मतदारसंघाचे खासदार आहेत.

आता राजनाथ सिंगांची ही मागणी केल्याने एकंदर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचं जसवंत सिंगांनी स्पष्ट केलंय.

close