फिल्म रिव्ह्यु : रागिनी MMS 2

March 21, 2014 10:12 PM0 commentsViews: 5482

अमोल परचुरे, समीक्षक

रागिनी MMS 2 हा सिक्वेल आहे हे तर सगळ्यांना माहित आहेच..पहिला सिनेमा आला तेव्हा एमएमएसचं फॅड एकदम नवीन होतं, त्यामुळे तशा प्रकारच्या फ्रेममध्ये सिनेमा बघणं हा अनुभव नक्कीच नवीन आणि वेगळा ठरला. आता सिक्वेल येईपर्यंत एमएमएसचं नावीन्य राहिलेलं नाहीये आणि याची कल्पना असल्यामुळेच सनी लिओनेला जागा मिळाली असावी. सनी लिओने हेच सिनेमाचं प्रमुख आकर्षण राहील याची पूर्ण काळजी प्रमोशन करताना घेतली गेली. सनी लिओनेमुळेच या सिनेमाला बॉलीवूडचा पहिला ऍडल्ट हॉरर मूव्ही असं म्हणता येईल, किंवा रामसे बंधूंच्या सिनेमांचा आधुनिक अवतार असंही म्हणता येईल. प्रेक्षकांनी घाबरत घाबरत सनी लिओनेनं केलेल्या अंतर्वस्त्रांचं प्रदर्शन बघावं असाच विचार निर्माता-दिग्दर्शकाला केला असणार.

काय आहे स्टोरी
Maine-Khud-Ko-RaginiMMS2-1024x576
पहिला रागणी एमएमएस जिथे संपला तिथून हा सिनेमा सुरू झालाय. सनी लिओनने एका चेटकीणीची भूमिका साकारली आहे रागिनी आणि उदय नावाचं एक कपल सुट्टी एन्जॉय करण्यासाठी एका एका भुताने पछाडलेल्या बंगल्यात जातात. आणि मग अपेक्षेप्रमाणे भयपटाचा थरार पाहण्यास मिळतो. यात उदय मरण पावतो आणि रागिनी वेडी होते. पुढे काय होते हे चित्रपट पाहुनच एन्जॉय केलं तरच भयपट पाहण्यात मजा आहे.

परफॉर्मन्स
ragini45
अर्ध्यापेक्षा जास्त सिनेमाभर सनी लिओने अर्ध्याहून कमी कपड्यात बागडलेली आहे. सिनेमात जिथे जिथे सनीला पूर्ण कपड्यात अभिनय करायचाय तिकडे ती अनकम्फर्टेबल दिसते पण त्याचमुळे खरंतर, संध्या मृदूलने केलेला चांगला अभिनय बाजूला पडतो. भूत बदला घेणार म्हटल्यावर पुढे काय काय घडणार याचाही आता अंदाज यायला लागलेला असतो, तरीसुद्धा मध्ये मध्ये धक्के देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सगळ्यात महत्त्वाचं, सिक्वेल बघण्यापूर्वी आधीचा सिनेमा पाहायलाच हवा असंही अजिबात नाहीये. जिस्म असो किंवा जॅकपॉट.. सनी लिओने अभिनय करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असली तरी अजूनतरी तिला त्यात यश मिळालं नाहीये.. बाकी दिव्या दत्ता, प्रवीण डबास यांनी आपापलं काम चांगलं केलेलं आहे.

रेटिंग – 50

close