अडवाणी युगाचा अजून अस्त नाही : शिवसेना

March 22, 2014 3:33 PM0 commentsViews: 912

Image udhav_on_karnatak_election_300x255.jpg22 मार्च : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीवरुन शिवसेनेनं आपल्या मित्रपक्षाचे कानउघाडणी केलीय. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीवरून जी भाजपमध्ये खलबतं झाली त्यावर टीका करण्यात आलीय. भाजपमध्ये मोदीयुग सुरू झालं असलं तरी अडवाणी युगाचा अस्त झालेला नाही असं सूचक विधान या अग्रलेखात करण्यात आलंय.

तसंच अडवाणी हे ज्येष्ठ नेते असून त्यांचा जनतेशी संपर्क अजून तुटलेला नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांशी जनतेचे नाते तुटलेले नाही. सध्या राजकारणात घडत असलेल्या भल्याबुर्‍या प्रसंगांच्या तुलनेत अडवाणींची गोष्ट छोटी वाटत असली तरी दुर्घटना मोठी घडू शकते.

अडवाणींच्या उमेदवारीवरून जो वादंग निर्माण झाला ही गोष्ट छोटी वाटत असली तरी त्यांना नाराज करणं एनडीएला परवडण्यासारखं नाहीये. वेळ निघून गेली तर मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते. तेव्हा वेळीच सावध व्हा असा सल्ला या अग्रलेखातून शिवसेनेनं आपल्या मित्रपक्षाला दिलाय. एवढेच नाहीतर ज्येष्ठांचा पक्षात योग्य तो आदर करणं गरजेचं आहे. सरकार मोदींच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल यात शंका नाही पण त्याचवेळी अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून हे करणे उचित होणार नाही असं सूचक विधानही या अग्रलेखात करण्यात आलंय.

भाजपला सल्ला
“अडवाणी हे ज्येष्ठ नेते असून त्यांचा जनतेशी संपर्क अजून तुटलेला नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांशी जनतेचं नाते तुटलेलं नाही. सध्या राजकारणात घडत असलेल्या भल्याबुर्‍या प्रसंगांच्या तुलनेत अडवाणींची गोष्ट छोटी वाटत असली तरी दुर्घटना मोठी घडू शकते. भाजपमध्ये मोदीयुग सुरू झालं असलं तरी अडवाणी युगाचा अस्त झालेला नाही. सरकार मोदींच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल यात शंका नाही पण त्याचवेळी अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून हे करणे उचित होणार नाही. वडीलधारे म्हणून त्यांचं स्थान मोलाचं आहे व तसंच राहील. भारतीय जनता पक्षांतर्गत जे घडत आहे, ते प्रसिद्धीमाध्यमांत येत असल्यानं आम्ही त्याकडे तटस्थ पाहत आहोत.”

close