राहुल द्रविडची सर्वाधिक कॅचेसच्या रेकॉर्डची बरोबरी

March 18, 2009 7:02 AM0 commentsViews: 5

18 मार्च राहुल द्रविडसाठी न्यूझीलंडमध्ये हॅमिल्टन इथे चालेली टेस्ट स्मरणीय ठरली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅचेसच्या रेकॉर्डची त्याने बरोबरी केली आहे. झहीर खानच्या बॉलिंगवर मार्टिन गुपटिलचा कॅच पकडत द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये 181 कॅचेस पूर्ण केल्या आहेत. सर्वाधिक कॅचेसच्या यादीत आता तो ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉसह पहिल्या स्थानावर आहे. 132व्या टेस्टमध्ये द्रविडने हा पल्ला गाठलाय. गुपटिलची विकेट पहिल्या दिवसातली भारताची पहिली विकेट होती. तिसर्‍या स्लीपमध्ये उभा असलेल्या द्रविडने त्याचा कॅच बिनचूक घेतला.

close