असली भाजप विरुद्ध नकली भाजप असाच सामना -सिंग

March 22, 2014 4:26 PM0 commentsViews: 826

news_jaswant singh_bjp22 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी मनासारखी उमेदवारी न दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. बारमेर लोकसभेतून उमेदवारी नाकारल्यानं ते नाराज आहेत. बारमेरमधून ते अपक्ष लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 24 तारखेला आपला अंतिम निर्णय जाहीर करू असं सिंग यांना स्पष्ट केलं.

पण यावेळी त्यांनी पक्षावर टीका केली. आपला सामना ‘असली भाजप विरुद्ध नकली भाजप’ असा आहे आणि असली आणि नकली भाजपचा निर्णय जनताच ठरवू शकते अशी जळजळीत प्रतिक्रिया सिंग यांनी दिली. तर जसवंत सिंग यांचा योग्य सन्मान ठेवू, असं भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे बारमेरमधल्या उमेदवारीवर फेरविचार नाही, असे संकेत अरुण जेटलींनी दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये पेच आणखी वाढलाय. जसवंत सिंग यांनी ही शेवटची लोकसभेची निवडणूक असल्याने स्वतःच्या राज्यातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यासाठी त्यांनी बारमेरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पण जसवंत सिंग यांची मागणी धुडकावत भाजपने बारमेरमधून कर्नल सोनाराम चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून बारमेरमधून निवडणूक लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

close