काकांसाठी बोगस मतदानाची जबाबदारी माझ्यावर होती-मुंडे

March 22, 2014 6:19 PM1 commentViews: 5103

22 मार्च : बीडमध्ये पुन्हा एकदा काका मुंडे विरोधात पुतण्या मुंडेंनी दंड थोपाटले आहे. गेल्या निवडणुकीत काकांसाठी बोगस मतदानाची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती असा गौप्यस्फोट भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. यावेळी असे काही जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी बोगस मतदान होऊ देणार नाही अशी ग्वाहीही धनंजय मुंडे यांनी दिली. तसंच ऑलिम्पिकमध्ये जर लबाड बोलण्याची स्पर्धा घेतली तर आपल्या देशाचं नेतृत्व करणार्‍यासाठी जर उद्याचे माजी खासदार होणारे आणि ते आमचे काका गोपीनाथ मुंडे यांना जर पाठवलं तर ते नक्की बक्षीस जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही. कोण कुणाचा घात कसा केला हे मी सांगणार नाही पण त्याचं मी एक उदाहरण आहे अशी विखारी टीकाही धनंजय मुंडे यांनी केली. बीड जिल्ह्यात गेवराई इथं झालेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते.

  • सागर गाटे

    धनंजय मुंडे, बोगस मतदान करताना त्यावेळी लाज वाटली नाही का?? आता आम्हाला सांगताय.लाज वाटून दया जरा……अजितदादा काही बरतोय आणि आता सगळी राष्ट्रवादीच बरळायला लागली

close