मोदी पंतप्रधान झाले तर देशाच्या ऐक्याला सुरूंग लागेल -पवार

March 22, 2014 6:05 PM1 commentViews: 1434

22 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये प्रचाराचे नारळ फोडले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार तोफ डागली. मोदींनी पंतप्रधान होणं म्हणजे देशाच्या ऐक्याला सुरूंग लावण्यासारखं आहे, अशी टीका पवारांनी केली. बीड जिल्ह्यातील गेवराई इथं सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.

गुजरात दंगलीला मोदीच जबाबदार आहे. मोदी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहे पण दंगलीतील पीडितांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही. मग देशाच्या जनतेनं याबद्दल कसा विचार करायचा ? म्हणून मिळालेल्या सत्तेचा वापर एका धार्मिक भावनेनं कमी करुन बहुसंख्य आणि अन्य धर्मीय लोकांच्या हिताची जपवणूक त्यांच्या कारकिर्दीत कधी झाली नाही. त्यामुळे अशा माणसाच्या हातात सत्ता देणे म्हणजे देशाच्या ऐक्याला सुरूंग लावणे आहे असं परखड मत पवारांनी व्यक्त केलं. तसंच गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला त्याबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलं. तसंच शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये आपला संसार पुन्हा उभा करा असं आवाहनही पवारांनी शेतकर्‍यांना केलं.

  • सागर गाटे

    थुंकी पुसा आधी आणि मग बोला

close